मनसेला सत्ताधारी नको तर राज्यातला सक्षम विरोधी पक्ष बनवा : राज ठाकरे


वेब टीम : मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या भाषणातून एक इच्छा व्यक्त केली आहे. ती इच्छा म्हणजे पहिल्यादांच एका राजकीय पक्षाने केलेली मागणी केलेली आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून मला प्रबळ विरोधी पक्ष व्हायचं आहे अशी मागणी केली.

ही मागणी आजवर कुणीही केली नाही. तुमचे प्रश्न मांडण्यासाठी मला प्रबळ विरोधी पक्ष बनवा अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

राज्याला सध्या मजबूत आणि सक्षम विरोधी पक्ष आणावा याची गरज आहे. सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्ष हवा आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सांताक्रुझ या ठिकाणी राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली सभा रंगली होती. अवघ्या १० ते १५ मिनिटात राज ठाकरे यांनी भाषण आटोपतं घेतलं.

महाराष्ट्राला कुणाही समोर घरंगळत न जाणारा सक्षम विरोधी पक्ष महाराष्ट्राला हवा आहे.

विरोध करणारं कुणी नसेल तर जे सरकार येईल ते तुमच्यावर वरवंटाच फिरवेल. अशा सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी विरोधी पक्ष ही काळाची गरज आहे.

मात्र माझ्या आवाक्यात जे दिसतं आहे तेच तुम्हाला सांगतो आहे. असं म्हणत विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

ही निवडणूक मी एवढ्यासाठी लढवतोय की तुमच्या मनातला राग, तुमच्या मनातला सरकारविरोधातला जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी, आम्हाला निवडून यायचं आहे कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला हवं तसं चिरडून टाकेल असाही आरोप राज यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post