संजय राऊत तिखट, तर आम्हीही चिकट : आठवले


वेब टीम : मुंबई
सत्ता स्थापनेवरुन शिवसेना आणि भाजपामधला तणाव वाढत असताना आता महायुतीतील घटक पक्षांनीही आपल्या अपेक्षा मांडायला सुरुवात केली आहे.

महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘रिपब्लिकन पक्षाला कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्यात यावे. चार मित्रपक्षांना चार मंत्रीपदे मिळावीत’, अशी मागणी केली आहे.

तसेच ‘पाच वर्षांसाठी आम्हाला एकच मुख्यमंत्री हवा आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी आपला पाठिंबा आहे. संजय राऊत यांची भूमिका हळूहळू बदलत आहे. राऊत तिखट असले तर आम्हीही चिकट आहोत’, असंही आठवले म्हणाले आहेत.

महायुतीतील मित्र पक्षांची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी बोलताना ‘आम्हा चार मित्रपक्षांना चार मंत्रिपदे मिळावीत. जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिलेला आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने सत्ता स्थापनेबाबत एकत्र बसून चर्चा करावी आणि लवकरच तोडगा काढावा.

भाजपने विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमच्यासाठी तेच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला असून मुख्यमंत्री बनण्यात त्यांना अडचण नाही’, असं आठवले म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post