मोदींच्या मंत्र्याने मंदीचा संबंध जोडला चित्रपटांच्या कमाईशी


वेब टीम : दिल्ली
आर्थिक मंदीच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तीन लोकप्रिय चित्रपटांच्या कमाईचे उदहारण दिले.

तीन चित्रपटांनी २ ऑक्टोबरला १२० कोटींची कमाई केली. ही आर्थिक मंदीची स्थिती नाही असे रवी शंकर प्रसाद एका पत्रकार परिषदेत म्हणाले.

आर्थिक मंदीवर जेव्हा रवी शंकर प्रसाद यांना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी हसून मंदीचा दावा फेटाळला.

अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असून देशाने तीन चित्रपटांमधून १२० कोटी कमावल्याचे उत्तर दिले.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मी माहिती आणि प्रसारण मंत्री होतो.

मला चित्रपट पाहायला आवडतात. चित्रपट मोठा व्यवसाय करतात.२ ऑक्टोबरच्या मुहूर्तावर तीन चित्रपट प्रदर्शित झाले.

चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा यांनी त्या चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केल्याचे मला सांगितले.

देशात १२० कोटी रुपये आले हे सुदृढ अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे असे रवी शंकर प्रसाद म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post