तुमच्या गाडीला 'रेट्रो टेप' लावली ना?; अन्यथा होईल दंड


वेब टीम : दिल्ली
वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी सरकार आता नव्या नियमांनुसार गाड्यांच्या नंबर प्लेटवर रेट्रो टेप म्हणजेच चमकदार पट्टी लावणे बंधनकारक करणार आहे.

नियमांनुसार जर कोणत्याही गाडीच्या नंबर प्लेटवर रेट्रो टेप लावली नाही तर वाहन चालकांकडून दंड आकारला जाणार आहे.

रस्त्यांवर होणारे अपघात टाळण्यासाठी सरकार हा विचार करत आहे.

नंबर प्लेटवर रेट्रो टेप लावल्याने अंधारातही गाडीवर प्रकाश पडल्यास तो चमकतो. त्यामुळे आपल्या मागे किंवा पुढे एखादे वाहन असल्याची माहिती वाहनचालकाला मिळते.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय याच आठवड्यात पत्रक काढण्याची शक्यता आहे.

वाहन चालकांची सुरक्षा लक्षात घेऊनच हे महत्वाचे पाऊल उचलणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या नियमानुसार ऑटो रिक्षा आणि ई-रिक्षांमध्ये पुढील बाजूला सफेद रंगाची आणि मागील बाजूला लाल रंगाची रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप बंधनकारक होणार आहे.

हा टेप २० मीमीपेक्षा कमी असू नये. गाडीचा वेग २५ किलोमीटर प्रति तास असला तरी त्याची चमक ५० मीटर लाबूनही दिसावी, असे नियमांमध्ये नमूद केले आहे.

यापूर्वी या नियमांमधून ई-रिक्षांना सूट दिली होती. परंतु ई-रिक्षांचेही वाढते अपघात पाहता त्यांनाही ही टेप लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post