सलमान खानला जीवे मारण्याची धमकी; दोघांना अटक


वेब टीम : मुंबई
अभिनेता सलमान खान याला काही दिवसांपूर्वी गॅरी शूटर नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून जीवे मारण्याची धमकी आली होती.या प्रकरणी राजस्तान पोलिसांकडून दोघांना अटक झाली आहे.

पंजाबमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याला गाडी चोरल्याच्या आरोपात अटक केली. त्याचवेळी बिष्णोईने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे उघड झाले.

मात्र, बिष्णोई यानं ही धमकी का दिली, याबाबत त्यावेळी माहिती मिळालेली नव्हती. आता मात्र हे कारणही स्पष्ट झाले.

लॉरेन्स बिष्णोई याला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवायची होती, सलमानला धमकी दिल्यावर तो प्रसिद्द होईल त्यामुळे त्याने सलमानला जीवे मारण्याची खोटी धमकी दिल्याचा खुलासा बिष्णोईने केला.

सलमान खान याला मारण्याची धमकी देताना त्याने लिहिले होते की, ‘सलमान तू भारतीय न्यायव्यवस्थेच्या नजरेत निर्दोष असू शकतोस, पण बिश्नोई समाज आणि सोपू पार्टीच्या नजरेत तू दोषी आहेस आणि त्यासाठी तुला मृत्यूदंड सुनावण्यात येतो आहे.

सोपूच्या न्यायालयात तू दोषी आहेस’ असे लिहून त्याने पोस्ट व्हायरल केली होती. लॉरेन्स बिष्णोई याच्यावर हत्येचा प्रयत्न, खंडणी व बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे अशा प्रकारचे २०हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post