केवळ हिंदुत्वाचा विचार पसरवणे देशासाठी घातक : शरद पवार


वेब टीम : कोल्हापूर
भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचे सांगितले. देशात केवळ हिंदुत्वाचा विचार पसरवणे हे देशासाठी घातक आहे. या देशात सर्व धर्मियांचा सन्मान राखायला हवा.

केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. देशात सर्व धर्मियांचा सन्मान होणं गरजेचं असल्याचे सांगत पवारांनी शिवसेना आणि भाजपवर टीका केली.

निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापुरातील आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. यावेळी पवार बोलत होते.

या बैठकीला काँग्रेसचे सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील आणि आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post