शिवाजीनगरमध्ये काँग्रेसला धक्का; माजी उपमहापौर भाजपच्या गोटात


वेब टीम : पुणे
शिवाजीनगरमधील काँग्रेसच्या उमेदवाराला धक्का बसला आहे. माजी उपमहापौर आणि याच मतदारसंघातील मुकारी अलगुडे यांनी थेट भाजपच्या गोटात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत.

त्यातच युतीमध्ये सहभागी असलेल्या आरपीआयचा रुसवा काढण्यात यश आल्यामुळे काँग्रेस उमेदवाराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ऐन निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अनेक दिग्गज आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी यांनी भाजपची वाट धरली आहे.

शिवाजीनगरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये ‘काटे की टक्कर’ आहे. त्यातच मुकारी अलगुडे यांचा भाजप प्रवेश काँग्रेसला धक्का मानला जात आहे.

वडारवाडी, गोखलेनगर या भागात अलगुडे यांचे काम आहे. त्यांनी या प्रभागाचे प्रतिनिधीत्वही केले आहे.

त्यामुळे काँग्रेसच्या मतांवर फरक पडण्याची शक्यता येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post