भाजप की काँग्रेस- राष्ट्रवादी? आज ठरणार शिवसेनेची रणनीती; आज 'ही' महत्वाची घडामोड


वेब टीम : मुंबई
सत्तेसाठी राज्यातील जनतेने पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिला असला तरी यावेळी दोन्ही पक्षांचे संख्याबळ पाहिल्यास शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे.

भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या असून बहुमताचा १४५ हा आकडा लक्षात घेता शिवसेनेच्या तालावरच भाजपला चालावे लागणार आहे.

त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पावर वाढल्यामुळे गेली पाच वर्षे भाजपमागे फरफटत जाणाऱ्या शिवसेनेने निकाल स्पष्ट झाल्यानंतर लगेचच भाजपची कोंडी करायला सुरुवात केली आहे.

विधानसभा निवडणुकीतील सर्वच जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

आज शिवेसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक दुपारी 12 वाजता मातोश्रीवर होत आहे.

बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांचा कल जाणून घेणार असून त्यानंतरच सेनेची पुढची दिशा ठरविली जाणार असल्याचे समजते. शिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्यूल्यावर आग्रही आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates