सर्जिकल स्ट्राईक ३ : लष्कराच्या कारवाईत २२ अतिरेकी ठार, पाक सैनिकांनाही कंठस्नान


वेब टीम : जम्मू
भारतीय लष्करानं पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. काश्मीरमधल्या तंगधारमध्ये दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करण्यासाठी पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला.

या गोळीबाराला सडेतोड उत्तर देत भारतीय जवानांनी ११ पाक सैनिकांना कंठस्नान घातलं.

कारवाई सुरु असतानाच जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे चार ते पाच अड्डेही उद्ध्वस्त केले. यात आतापर्यंत २२ दहशतवादी ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे.

जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये रविवारी सकाळी सीमेपलीकडून काही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. पाकिस्तानी सैन्यानं बेछुट गोळीबार करत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला.

या गोळीबारात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले. एका भारतीय नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला तर दोन नागरिक जखमी झाले आहेत.

या गोळीबाराला ठोस प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केली.

पाकव्याप्त काश्मीरमधल्या नीलम खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या चार ते पाच अड्ड्यांवर उखळी तोफांचा मारा करत जवानांनी ते उद्ध्वस्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post