मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटणार; ठाकरे- शहा यांच्यात होणार बैठक


वेब टीम : मुंबई
महायुतीच्या माध्यमातून आपण सोबत निवडणूक लढलो, जनतेने महायुतीला मोठा आशीर्वाद दिला, राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होणार आहे.

कोणत्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. उत्तम सरकार पुन्हा स्थापन होईल. पुढचे पाच वर्ष शिवाजी महाराजांच्या विचाराने महायुतीचे सरकार कार्य करेल. असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

फडणवीस यांची आज भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. त्यानंतर ते बोलत होते.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव सादर केला.

त्याला राधाकृष्ण विखे-पाटील, हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, संजय कुटे, गणेश नाईक यांनी अनुमोदन दिलं आहे.

त्यानंतर एकमतानं त्यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवारांसह जवळपास ११ आमदारांनी फडणवीसांची विधिमंडळ नेतेपदी निवड होण्यासाठी अनुमोदन दिलं असून, फडणवीसांची नेतेपदी निवड झाली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post