'या' कारणामुळे ऑक्टोबरमध्ये ११ दिवस बँका राहणार बंद


वेब टीम : दिल्ली
दिवाळी आणि दसऱ्या या सणांमुळे पुढील महिन्यात ११ दिवस बँका बंद आहेत.त्यामुळे ऑक्टोबरमध्ये बँकेची कामासाठी योग्य नियोजनाची गरज आहे.

११ दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे एटीएममध्ये चलनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती, राम नवमी, दसरा, दिवाळी, गोवर्धन पुजा आणि भाऊबीज यांसारखे सण आले आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग तीन दिवस आणि चौथ्या आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.

 सहा ऑक्टोबरला रविवार, सात ऑक्टोबरला महानवमी आणि ८ ऑक्टोबरला दसऱ्या निमित्त बँका बंद राहणार आहेत.ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही सलग चार दिवस बँका बंद आहेत.

महिन्यातील चौथा शनिवार असल्याने २६ ऑक्टोबरला दिवाळीला रविवारी (२७ ऑक्टोबर) सुरुवात होणार असून, २८ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे. २९ ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँका बंद राहणार आहेत.

या सर्व सुट्ट्यांमुळे एटीएमवर भार येण्याची शक्यता आहे. यासाठी खातेदारांनी आधीच कामांचे नियोजन करावे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post