दोन्ही राजांचे साताऱ्यात शक्तिप्रदर्शन; उमेदवारी अर्ज दाखल


वेब टीम : सातारा
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेले सातार्‍याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. 

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे यांनी, तर सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रसिंह भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे. हे दोन्ही राजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना दोघांमधील वाद विकोपाला गेले होते. 

मात्र, भाजपवासी झाल्यापासून दोघांमध्ये दिलजमाई झाली आहे. काल या दोन्ही बंधूंनी कार्यकर्त्यांसह एकत्रित शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. 

सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राजे भाजपमध्ये गेल्यामुळे यंदाचा निकाल पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 

राष्ट्रवादीनेही उदयनराजेंविरोधात सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. 

त्यामुळे लढत चुरसीची ठरणार आहे. शिवेंद्रसिंह राजेंविरोधात भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले दीपक पवार लढण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post