उदयनराजे चिडले; मग सांगितले भाजपात जाण्याचे 'हे' खरे कारण


वेब टीम : सातारा
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यामुळे सातारा मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उदयनराजे यांचा राग अनावर झाला .

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही नरेंद्र पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली. आता मात्र तुम्ही दोघे एकत्र दिसत आहात,’ असं म्हणत एका पत्रकाराने उदयनराजेंना पक्षांतराविषयी प्रश्न विचारला.

या प्रश्नावर उत्तर देताना उदयनराजे काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ‘मी कोणत्या पदासाठी पक्ष सोडला नाही तर साताऱ्याच्या विकासासाठी आणि लोकांसाठी पक्ष सोडला आहे,’ असं उदयनराजे म्हणाले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post