उद्धव ठाकरेंचे सोशल इंजिनिअरिंग; राबविला 'माधव' पॅटर्न


वेब टीम : मुंबई
तुमच्यापैकी आज कोणीही आमदार, खासदार नाहीत, मात्र तुम्ही आमच्याबरोबर आहात. हीच ताकद मला आणि शिवसेनेला हवी आहे, साधीसुधी माणसंच इतिहास घडवत असतात.

त्यामुळे आता इतिहास घडणार नाही तर तो आम्ही घडवणार आहोत. असा विश्वास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर, कुणबी, माळी,तेली, वंजारी, ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या नेत्यांशी चर्चा करतांना दिला.

यावेळी ठाकरे म्हणाले की, या समाजातील लोकांच्या मागण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहो. आगामी निवडणुकीत शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करा. आपण सर्व मिळून रणांगणात उतरुया. असे आवाहन त्यांनी यावेळी सर्व समाजाच्या नेत्यांना केले.

उद्धव ठाकेर विविध समाजाच्या नेत्यांशी बोलताना म्हणाले की, लढाईच्या वेळेला जे सोबत येतात ते खरे सारथी असतात. जागा वाटपाची चर्चा सुरू असताना, आणि अर्ज भरण्याची वेळ निघून गेल्यावर आपण मला भेटलात.

आपल्यापैकी एकही आले नाही, यासाठी म्हणून तुम्हाला खास धन्यवाद द्यायचे आहे. कोणत्याही आम्हाला अपेक्षा नाही फक्त समाजाला न्याय मिळवून द्या. जे सरकार समाजाला न्याय मिळवून देणार नसेल तर ते सरकार काय कामाचे.

साथी सोबती कसा असतो तर आमदारकी किंवा खासदार की मिळेल हे पाहणारे नसून समाजासाठी झटणारा असतो.

साधी सुधी माणसं असतात तेच इतिहास घडवतात. साध्या माणसांनीच मोगलांचे तख्त फोडले. आपण भंडारा उधळला आहे आता आपण इतिहास घडवणार. जे अशक्य होते ते शिवाजी महाराजांनी आपल्याला शक्य करून दाखवलं आहे.

आपण या मातीतले आहोत. संत गाडगे महाराज म्हणाले होते अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा समाजाला देण्यासाठी मी कटिबध्द आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार आल्यावर मागण्यांचा पाठपुरावा तुम्ही नका करू मी स्वतः करणार आहे.

 तुम्ही धरलेला हात आता सोडायचा नाही. तुमची सोबत मला फार मोलाची आहे. तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुम्हाला दिलेली वचने पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.

यावेळी त्यांनी मित्रपक्षांनादेखील टोमणा मारला. जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका, असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे. शिवसेना असा एक पक्ष आहे की जी सत्तेत असून देखील शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरला. शिवसेना पक्ष हा समाजासाठी आहे.

समाजाचे प्रश्न हे गेली ६० ते ७० वर्ष पासून आहेत म्हणून ते आज आमच्या सोबत आलेले आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांचे प्रश्न आपण सोडवनार आहोत आणि तसे नसेल तर दुसऱ्या मार्गाने ते सोडवू. माझ्यासोबत आलेले हे आजचे मित्र आहेत ते जागा मागत नाहीत तर फक्त आमच्यासाठी जागे रहा असे बोलत आहेत.

जागावाटपात अनेकांनी अधिकच्या जागा मागितल्या होत्या. मात्र भाजपने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली म्हणजे दिली. विरोधी पक्षालाही जागा दाखवण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. आता लोकशाहीच्या महायुद्धाला सुरुवात झाली आहे.

आता भाजपाला दिलेला हात सोडायचा नाही. निवडणूक म्हणजे लोकशाहीतील युद्ध आहे. हे युद्ध आम्ही जिंकणारच असा दावाही त्यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post