भारत- चीन सीमा प्रश्नावर निघणार तोडगा?; शी जिनपिंग भारत दौऱ्यावर


वेब टीम : दिल्ली
चीनचे अध्यक्ष शी जिनिपिंग हे 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत.

भारत आणि चीन कडून आज (बुधवारी) या भेटीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारत आणि चीन यांनी याआधी प्रादेशिक पातळीवर अनेक प्रश्न सोडवले आहेत. सीमावादामुळे दोन देशांतील संबंध बिघडू नये, याची काळजी दोन्ही देशांनी घ्यायला हवी, असे वेईडोंग म्हणाले.

भारत आणि चीनमध्ये सध्या सीमाप्रश्नांवर वादविवाद सुरु आहेत. दोन्ही देशांमध्ये 3488 किमी नियंत्रण सीमा रेषेवरून(एलओसी)वाद आहे.

सीमेवर शांतता राखण्यासाठी भारत आणि चीन यांनी सीमा प्रश्न संवादातून सोडवावा, असे मत चीनचे राजदूत सून वेईडोंग यांनी व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post