Google Assistant चा मोबाईल वापरणाऱ्यांना ताप


वेब टीम : दिल्ली
गुगलची उत्पादने सध्या स्मार्टफोन युजर्सना डोकेदुखी झाली आहे. गुगलच्या सुविधा त्रासदायक ऍप आणि व्हायरसला बळी पडताना दिसत आहेत.

गुगल असिस्टंटमध्ये नुकतेच शिरलेला बग हे याचे ताजे उदाहरण.जगभरातील अँड्रॉइड यूजर्सनी गुगल असिस्टंटमध्ये शिरलेल्या या बगबाबत तक्रार केली. गुगल असिस्टंट ऑन करण्यासाठी यूजर्सनी ‘Hey Google’ म्हणताच त्यांची स्क्रीन लगेचच फ्रीझ होते असे जगभरातील यूजर्सचे म्हणणे आहे.

हा बग स्क्रीन फ्रीझ करून स्क्रीन कायम ऑन ठेवण्याचे काम करतो. यामुळे फोनची बॅटरी लवकर रिकामी होत जाते. इतकेच नाही, तर यामुळे मोबाइल फोनचा डिस्प्ले देखील कायमचाच निकामी होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

या संदर्भात प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, ही समस्या सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आली होती. हा बग आता सर्वात जास्त गुगल पिक्सल स्मार्टफोन्स आणि गुगल होम डिव्हायसेसवर हल्ला करत असल्याचे दिसते.

 हा बग नेमका येतो कुठून याबाबत ठोस माहिती काही माहिती मिळालेली नाही.तर, गुगलने देखील बगबाबत कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. ही समस्या त्यामुळे नेमकी कधी सुटेल या संदर्भात अनिश्चितता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post