महायुतीला २०० च्या पुढे जागा मिळणार नाहीत : मनोहर जोशी


वेब टीम : मुंबई
निवडणुकीतील भविष्य कुणीही अचूक सांगू शकत नाही. महायुती 200 जागांच्या पार जाईल, असं मला वाटत नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. जोशी यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला, त्यावेळी ते बोलत होते.

जोशी म्हणाले की, मी अनेक निवडणुकांत भाग घेतला आहे. मात्र निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल याचं भाकित अचूक सांगता येत नाही.

निवडणूक काळातील शरद पवारांच्या सभा आणि दौऱ्यांवर बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत. मात्र ते करतात ती प्रत्येक गोष्ट योग्य असते, असं नाही. शरद पवारांच्या सभा, दौऱ्याचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला किती फायदा होईल हे आताचा सांगता येणार नाही.

मी शिवसेना प्रमुख्यांच्या विरोधात कधीही बोलत नाही. त्यामुळे सांगतो की, यावेळी राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे.

आदित्य ठाकरे यांना महत्त्वाचं पद मिळणार हे निश्चित आहेत. मात्र त्यांना कोणतं पद मिळेल हे योग्यवेळी समजेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post