खडकवासला मतदारसंघात याद्यांमध्ये गोंधळ


वेब टीम : पुणे
खडकवासला मतदार संघामध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाला आहे. माणिकबाग, सनसिटी रोड या भागातील मतदारांना वडगाव बुद्रुक येथील मतदान केंद्र देण्यात आले.

वडगाव बुद्रुकमधील काही मतदारांना धायरी येथील मतदान केंद्र देण्यात आले आहे. यामुळे मतदारांना चांगलीच पायपीट करावी लागत आहे.


जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदार केंद्र बदलल्याने मतदारांचा गोंधळ झाला आहे. माणिकबाग, वडगाव, सनसिटी रोड विभागातील मतदार मोठ्या संख्येने मतदान करत असतात.

मात्र मतदान केंद्र दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर बदलली गेल्याने मतदारांना त्रास झाला आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी दिली आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत खडकवासला मतदारसंघात २७.७८ टक्के मतदान झाले आहे. यात ७९५३२ पुरुष मतदार, ५५७६१ महिला मतदार अशा एकूण १,३५,२९३ मतदारांनी मतदान केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post