संगमनेरची 'फाईट' खरंच आहे का 'टाईट'? थोरात अडकले मतदारसंघातच


वेब टीम : अहमदनगर
संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिवसेनेकडून श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक साहेबराव नवले यांनी विधानसभा निवडणूक लढवली.

थोरातांचे पारंपरिक विरोधक विखेंनी ही लढत प्रतिष्ठेची केल्याने संगमनेर मधील ही लढत जोरदार होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनीही संगमनेरमध्ये सभा घेतली होती.

लोकसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यातून भाजपला जास्त मते मिळाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या बाळासाहेब थोरात यांचे टेन्शन वाढले होते. त्यामुळे त्यांनी राज्यात जास्त दौरे करण्यापेक्षा स्वतःचा मतदारसंघ वाचविण्याकडे लक्ष दिल्याचे दिसून येते.

त्यांचे मेव्हणे असलेल्या आ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी संगमनेर मध्ये भेटी-गाठी घेत सभाही घेतल्या. त्यामुळे थोरातांना त्यांच्या मतदारसंघात अडकविण्यात भाजप यशस्वी झाली.

लोकसभेनंतर खबरदारी घेतल्याने थोरातांसाठी विधानसभा निवडणूक सोपी असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही फाईट आता टाईट वाटत असली तरी निकाल मात्र थोरातांच्या बाजूने लागण्याची चिन्हे आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post