नेवाशात 'नेवाशाच्या मुलांची'च हवा; शंकरराव गडाख विजयी


वेब टीम : अहमदनगर
नेवासा विधानसभा मतदारसंघात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार (अपक्ष) शंकरराव गडाख यांनी भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात विचारल्या जाणाऱ्या हवा कुणाची? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. 'आम्ही नेवाशाची मुलं' ही टॅगलाईन घेऊन निघालेल्या शंकरराव गडाख यांचीच मतदारसंघात हवा असल्याचे दिसून आले.

मतमोजणीच्या पहिल्या काही फे-यांमध्ये मुरकुटे व गडाख यांच्यात अत्यल्प आघाडी होती. त्यानंतर मात्र गडाख यांनी आघाडी वाढत गेली. त्यांनी नंतर निर्णायक २७ हजारांची आघाडी घेतली.

मुरकुटे व गडाख यांच्यामध्ये प्रचारातही चांगलीच रंगत आली होती. मुरकुटे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी सभा घेतल्या होत्या. गडाख यांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न घेता त्यांच्याच क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविली.

त्यांना राष्टवादीने पाठिंबा दिला होता. माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले यांनीही यावेळी गडाखांना पाठिंंबा देऊन त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. २०१४ च्या निवडणुकीत मुरकुटे यांनी गडाख यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गडाख यांनी वर्चस्व मिळविले होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post