मायक्रोसॉफ्टने सादर केला अँड्रॉइड स्मार्टफोन! : दोन डिस्प्ले असलेला Surface Duo


वेब टीम : न्यूयॉर्क
मायक्रोसॉफ्टने काल पार पडलेल्या मायक्रोसॉफ्ट इव्हेंटमध्ये त्यांच्या सर्फेस उत्पादनांची मालिका सादर केली.

यामध्ये Windows 10X ही ऑपरेटिंग सिस्टम, Surface Pro X, Surface Pro 7 हे टॅब्लेट, Surface Laptop 3 हा लॅपटॉप, Surface Neo हा ड्युयल डिस्प्ले असलेला टॅब्लेट, Surface Earbuds आणि Surface Duo हा ड्युयल डिस्प्ले अँड्रॉइड फोन यांचा समावेश आहे.

यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे मायक्रोसॉफ्ट सर्फेस ड्युओ हा अँड्रॉइड फोन! मायक्रोसॉफ्टने स्वतः ड्युयल डिस्प्ले असलेला अँड्रॉइड फोन सादर केला आहे!


या फोनमध्ये दोन 5.6 इंची डिस्प्ले असतील जे ३६० अंशात घडी घालून फिरवता येतील. घडी उलगडल्यास 8.3 इंची डिस्प्ले असलेला टॅब्लेट स्क्रीन वापरण्यास मिळेल. यामध्ये ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइडची असून इतर सुविधा मायक्रोसॉफ्ट पुरवणार आहे.

फोनमध्ये Snapdragon 855 प्रोसेसर असला तरी प्रत्यक्ष फोन सादर होण्यास वेळ असल्याने त्यावेळी सर्वात वेगवान असलेल्या प्रोसेसरचा समावेश केला जाईल.

हे डिव्हाईस गूगलच्या अँड्रॉइड टीमसोबत भागीदारी करून बनवण्यात येत असून एकाच फोनमध्ये दोन डिस्प्ले जोडून त्यांच्या अॅप्ससाठी योग्य वापर करता यावा या दृष्टीने बदल करण्यात आले आहेत. हा फोन २०२० मध्ये उपलब्ध होणार असून अद्याप याच्या चाचण्या सुरू आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post