तिघे मिळून विश्वासमताच्या वेळी भाजपचा पराभव करू- अहमद पटेल


वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने सगळा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना विश्वासमताच्या वेळी भाजपचा पराभव करेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी आज शनिवारी झालेल्या पत्रपरिषदेत केला.

आम्ही राजकीय आणि कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ. आमचे सर्व आमदार एकत्र आहेत, असाही दावा त्यांनी केला.

यावेळी अहमद पटेल म्हणाले, राज्यपालांनी काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी दिली नाही.

‘बँड-बाजा-बारात’ याशिवाय हा शपथविधी झाला. ज्या प्रकारे शपथविधी उरकला, ते पाहता महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने ही घटना लिहिली जाईल, असे ते म्हणाले. महाराष्ट्राची जनता ही संविधानावर विश्वास ठेवणारी आहे.

संविधानाची अवहेलना करून शपथविधी उरकण्यात आला आहे, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही बैठका झाल्या.

सत्तास्थापनेसाठी काँग्रेसकडून उशीर झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी फेटाळून लावला. सत्तास्थापनेमध्ये काँग्रेसकडून उशीर झाला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने हा पेच निर्माण झाला. आम्ही तिन्ही पक्ष मिळून याचा सामना करू. राज्यपालांनी सर्वांना संधी द्यायला पाहिजे होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post