नगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास; बंदोबस्तासाठी मोदींना साकडे


वेब टीम : अहमदनगर
नगर शहर आणि उपनगरात मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. वर्दळीच्या प्रत्येक रस्त्यावर ही जनावरे बसून रहात आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.

अनेकदा या जनावरांमुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. रस्त्यावरुन जाताना जनावरे उधळल्यामुळे शिंग मारल्यामुळे अपघात होऊन जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत.

मोकाट कुत्रे लहान मुले, वृद्ध नागरिकांवर हल्ले करत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांना जीव गमवावा लागल्याच्या घटना नगरमध्ये घडल्या आहेत.

मोकाट जनावरे, कुत्र्यांमुळे जनता त्रस्त झाली असताना महापालिकेचे आयुक्त आणि इतर अधिकारी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने याबाबत कारवाईसाठी रॉबिन योसेफ पाटोळे (हातमपुरा, नगर) या ज्येष्ठ नागरिकाने थेट पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post