अहमदनगर जिल्ह्यात यंदा विक्रमी पावसाची होणार नोंद


वेब टीम : अहमदनगर
मागील वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणार्‍या नगर जिल्ह्यावर यंदा पावसाने चांगली कृपा केली मात्र सध्या जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

मागील 18 वर्षात यंदा जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद होण्याची चिन्हे निर्माण झाली असून 2017 मध्ये जिल्ह्यात 803 मि.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली होती.

यंदा जिल्ह्यात आतापर्यंत 781 मि.मि. पावसाची नोंद झाली असून अवकाळी पावसाचे वातावरण आणखी काही दिवस असेच राहिले तर 2017 च्या पावसाचा विक्रम यंदा मोडीत निघू शकतो.

दरम्यान अवकाळी पावसाने नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील कधीही न भरणारी धरणे ही सध्या ओसंडून वाहत असून लहान-मोठे तलाव तर यापुर्वीच ओव्हर फ्लो झाले आहेत.

 जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडे ही धरणे यंदाच्या पावसाळ्यात दोन पेक्षा अधिक वेळा ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा नदीपात्रात सातत्याने विसर्ग केला जात आहे.

तर दक्षिण भागातील मांडओहळ धरण ही यंदा ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पाण्यासाठी कायम आसुसलेले धाटशीळ धरणातील पाणीसाठा 41 टक्क्यांवर पोहोचला असून सीना धरण आतापर्यंत 70.83 टक्के भरले आहे.

कायम मृतपाणी साठा असणार्‍या खैरी धरणात यंदा 21.95 टक्के पाणीसाठा झाला आहे. अवकाळीचा जोर आणखी काही दिवस असाच राहिल्यास ही धरणेही ओसंडून वाहू शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post