भाजपचे नवे नाव ‘भारतीय जासूसी पार्टी’ : काँग्रेस


वेब टीम : दिल्ली
व्हॉट्सअ‍ॅपवरील हेरगिरीवरून रविवारी काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले की, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना देखील व्हॉट्सअ‍ॅपकडून स्पायवेअरशी निगडीत एक मेसेज आलेला आहे. जे फोन हॅक करणारे आहे, त्यावर व्हॉट्सअ‍ॅपकडून पाठवलेला मेसेज प्रियंका गांधी यांना देखील आला.‘अबकी बार जासूसी सरकार’ आणि भाजपचे नवे नाव ‘भारतीय जासूसी पार्टी’ असे आता जनता बोलत असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले.

तसेच, याबाबत मोदी सरकारने सखोल चौकशी व कठोर कारवाई करायला हवी,अशी देखील पत्रकार परिषदेद्वारे मागणी केली.

सुरजेवाला म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे देखील फोन हॅक केले आहेत.सरकार विरोधकांवर अशाप्रकारे लक्ष ठेऊन आहे की त्यांना राजकीय माहिती मिळवायची आहे.

हा एक अपराध आहे. तसेच, त्यांनी भाजप सरकार व त्यांच्या एजन्सीजकडून इस्रायलच्या ‘एनएसओ’ च्या एका सॉफ्टवेअरचा वापर करून राजकीय नेते, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार इत्यादींचे फोन हॅक करण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपाला हेरगिरी करणार पक्ष असे संबोधले. तसेच हे देखील सांगितले की, २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत पीगॅसस या स्पायवेअरचा वापर करून फोन हॅक करण्यात आले व याची सरकारला पूर्ण कल्पना होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post