राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलणार? फडणवीस - गडकरी यांच्यात खलबतं


वेब टीम : दिल्ली
महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या संदर्भात हालचालींना गती येत असल्याचे दिसत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली.

 शिवसेनेसह सर्वच पक्षांमधील नेत्यांबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे चांगले संबंध आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात असलेली नाराजी लक्षात घेता राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलणार का? आणि बदललेला चेहरा हा गडकरी यांचा असणार का? अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.


सध्या दोन्ही पक्षांत सत्तास्थापनेवरून जोरदार चढाओढ सुरू असून या पार्श्वभूमीवर गडकरी महत्त्वाची भूमिका निभावतात का हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे. गडकरी अनुभवी नेते असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली असल्याचे दिसत आहे.

सत्तेची समीकरणं महाराष्ट्रात रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेक जण बोलत आहेत. मी त्याबाबत काहीही बोलणार नाही. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होईल याची खात्री बाळगा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सरकार स्थापनेच्याही विविध चर्चा सुरू आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे सांगत आहेत. रविवारी तर त्यांनी आमच्याकडे १७० आमदारांचे पाठबळ असल्याचेही सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post