उद्धव ठाकरे यांनी घेतला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार


वेब टीम : मुंबई
गुरुवारी (दि.28) सायंकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.29) दुपारी मंत्रालयात प्रवेश केला. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्यावतीने गुरुवारी (दि.28) शपथ घेतली.

त्यानंतर लगेचच रात्री 8 वाजता मंत्रीमंडळाची बैठकही घेतली. यामध्ये किमान समान कार्यक्रमाची घोषणा केली.

त्यानंतर शुक्रवारी (दि.29) दुपारी त्यांनी मंत्रालयात प्रवेश केला. यावेळी त्यांचे विविध नेते तसेच मंत्रालयातील नेते-अधिकारी यांच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

प्रारंभी त्यांनी हुतात्मा चौकात जावून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मंत्रालयात ठाकरे यांच्यासमवेत मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांच्यासह आ.आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.

मंत्रालयातील महिला कर्मचार्‍यांनी ठाकरे यांचे औक्षण केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post