'या' फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना


वेब टीम : अहमदनगर
विनयभंग प्रकरणातील कोतवाली पोलिसांना तपासकामी पहिजे असलेला संशयित आरोपी अशोक केशव पंडित (रा.शाहगड, ता.गेवरा, जि.बीड) हा मिळून न आल्याने पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. त्याकरीता कोतवाली पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधात रवाना झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक केशव पंडित याने 29 एप्रिल 20019 रोजी केडगाव परिसरातील 44 वर्षीय महिलेचा घरात घुसून अश्‍लिल वर्तन करुन तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भादविक 354, 452, 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक छाया गायकवाड या करीत आहेत.

घटना घडल्यापासून पंडित हा पसार झाला असून तो अधुन-मधून त्याच्या गावी तसेच एमआयडीसी परिसरात रहात असल्याने पोलिसांना मिळून आला नाही.

त्याच्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फोन 2416117 वर संपर्क करावा असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post