फेसबुक, ट्विटर च्या युझर्सचा डेटा झाला लीक?


वेब टीम : दिल्ली
सोशल नेटवर्किंग मधील मोठ्या प्लॅटफॉर्म फेसबुक आणि ट्विटर युजर्सचा डेटा लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ट्विटर आणि फेसबुकने ही लाखो युजर्सचा डेटा चुकीच्या पद्धतीने ऍक्सेस केल्याचे मान्य केले.

 डेटाची चोरी गुगल प्लेवरील काही थर्ड पार्टी ऍप्स करत असल्याचे समोर आले आहे. ज्या युजर्सने या ऍपवर लॉगीन केले आहे त्यांचे जास्त नुकसान झाल्याचे समजते.

सिक्युरिटी रिसर्चच्या अहवालानुसार,वन ऑडियन्स आणि मोबीबर्न सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट युजर्सच्या डेटाचा ऍक्सेस देत होते. यात ई-मेल ऍड्रेस, युजरनेम आणि लेटेस्ट ट्वीट्सचा ऍक्सेस दिला आहे.

ज्या युजर्सचा डेटा ऍक्सेस ऍप्सना दिला आहे त्यांना नोटिफिकेशनद्वारे सूचीत करणार असल्याचे फेसबुक आणि ट्विटरकडून सांगण्यात येते. फेसबुकने ही डेटा चोरीची पडताळणी केल्यानंतर या या ऍप्सवर बंदी घातली.

फेसबुकच्या पॉलिसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे ऍप्स हटवले आहे. तसेच, फेसबुक युजर्सना डेटा लीकची माहिती देणार असल्याचे ही कंपनीने स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post