सरकार बदलले; 'ईडी'कडून आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू


वेब टीम : मुंबई
कुलाबा येथील वादग्रस्त आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळा प्रकरणाची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी सुरू झाली आहे.

आदर्श घोटाळा उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेते व तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता.

राज्यात स्थापन होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी लवकरच पार पडणार आहे.

या शपथविधीत अशोक चव्हाण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता होती. मात्र त्यापूर्वीच आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू झाली.

त्यातच काँग्रेसने शपथ घेणाऱ्या मंत्र्याची नावे जाहीर केली. यात चव्हाणांचा समावेश नसल्याने त्यांना आदर्शचा फटका बसल्याची चर्चा आहे.

कुलाबामध्ये मोक्याच्या जागेवर ३१ मजली ‘आदर्श’ टॉवरमध्ये नोकरशहा, राजकीय नेते आणि सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत. या गृहनिर्माण संस्थेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर फ्लॅटधारकांनाही आरोपी करण्यात आले.

 या प्रकरणी सीबीआयने अशोक चव्हाणांना आरोपी केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदही सोडावे लागले होते. या सरकारमध्ये त्यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात आहे. मात्र या चौकशीमुळे त्यांच्यापुढच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी आदर्श गृहनिर्माण संस्थेत जात जागेची व फ्लॅटमधील मोजणीही केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागच्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा चौकशी केल्याची माहितीही मिळत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post