अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झालाच नव्हता : फडणवीस


वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. 

त्यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली तसेच भाजपच सरकार स्थापन करेल असा विश्वासही व्यक्त केला.

त्यावेळी फडणवीस म्हणाले, अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. 

उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात जर विषय झालेला असेल तर ते मला माहित नव्हतं. मी तसं अमित शहा आणि नितीन गडकरी यांना विचारलं मात्र त्यांनीही असं काहीही ठरलेलं नाही असं सांगितलं. या संदर्भातले समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते. 

मात्र शिवसेनेने आमच्याशी चर्चाच केली नाही. मित्रपक्षाशी चर्चा करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी जास्त चर्चा केली. मी उद्धव ठाकरे यांना फोन लावले पण ते उचलले नाहीत. चर्चा न हाणायला केवळ शिवसेनाच जबाबदार आहे. 

आम्ही महायुतीत निवडून आलो त्यामुळे महायुतीची दारं बंद नाहीत. आम्ही अजूनही युतीत सोबतच आहोत. युती तुटली असं मी म्हणणार नाही.

काही लोक जाणीवपूर्वक वक्तव्य करुन दरी वाढवत आहेत. वक्तव्य करुन मिडीया स्पेस मिळते पण सरकार स्थापन करता येत नाही. भाजप आमदार फोडण्याचं करत आहेत असाही आरोप केला जात आहे. 

माझं खुलं आव्हान आहे की तुम्ही पुरावे द्या नाहीतर माफी मागा. सरकार स्थापन करताना भाजप फोडाफोडीचं राजकारण करणार नाही. आम्हाला त्याची गरजही नाही.

गेल्या आणि मागील दहा दिवसांत होत आहे. जशाच तशा भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो पण ते आम्हाला शोभत नाही. 

केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे आमच्यासोबत सत्तेत असणाऱ्या पक्षाकडून आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका होणे पटणारे नाही. 

विरोधकांनी केले नाही इतके घाव सेनेने केले. याची आम्हाला खंत आहे. मात्र आमची खंत दूर होणार असेल तर आम्ही चर्चा करण्याचा विचार करु.

माननीय राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला आहे, राज्यपालांनी तो स्वीकारला आहे. महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी गेली पाच वर्षे दिली त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. 

माझ्यासोबत ज्यांनी काम केलं ते सगळे अधिकारी, कर्मचारी यांचेही मी आभार मानतो. आमच्यासोबत असलेल्या शिवसेनेचेही मी आभार मानतो. ते आमच्यासोबत किती होते ते तुम्ही पाहिलंच.

निवडणुकीत आम्ही लढलेल्या जागांपैकी ७० टक्के जागा लोकांनी आम्हाला दिल्या. जे काम आम्ही केलं त्या कामाची पावती महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिली. अपेक्षेपेक्षा काही जागा कमी आल्या असतील. 

मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सरकार स्थापनेचे सगळे मार्ग खुले असल्याचं वक्तव्य केलं. लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं त्यामुळे हे वक्तव्य आमच्यासाठी धक्काच होता. त्यांनी हे वक्तव्य का केलं असावं हा प्रश्न निश्चितपणे आमच्यासमोर आला. 

मी पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे आभार मानले होते. गेले पंधऱा दिवस ज्या प्रकराची वक्तव्य या महाराष्ट्रात माध्यमांमधून आपल्याला पाहण्यास मिळाली ते दुर्दैवी आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post