शेतकऱ्याची समयसूचकता : रेल्वेला थांबवून वाचवले हजारोंचे प्राण


वेब टीम : अहमदनगर
सकाळची वेळ होती. नेहमी प्रमाणे एक शेतकरी आपल्या शेतात चालला होता. जवळच असलेली रेल्वे लाईन क्रॉस करून जात असताना अचानक तुटलेल्या रेल्वे रूळाकडे लक्ष गेले.

याच वेळी रेल्वे गाडी येत असल्याचे लक्षात आले. जवळ कोणीच नाही. तुटलेल्या रूळावरून रेल्वे गेली तर मोठा अपघात होईल ही शक्यता नाकारता येत नव्हती. रेल्वे कर्मचार्‍याला आवाज दिला तर आवाज जात नव्हता.

फोन केला तर फोन लागत नव्हता. नशीब अंगात लाल रंगाचे वस्त्र होते. जिवाची पर्वा न करता रेल्वे येते त्या दिशेने तो शेतकरी धावला व रेल्वेला लाल रंगाचे वस्त्र दाखवत ती रोखली आणि मोठा अपघात टळला. ही सत्य घटना आहे नगर तालुक्यातील विळद परीसरातील.

त्याचे झाले असे, मनमाडहून नगरच्या दिशेनं जाणारी भुसावळ-पुणे ही रेल्वे गाडी रविवारी(दि.10) सकाळी वांबोरीहून नगरच्या दिशेनं जात होती.

त्याचवेळी विळद(ता. नगर) रेल्वे लाईन क्रॉस करून आपल्या शेतात शेतकरी रामदास बापुराव थोरात (रा. विळद ता. नगर) हे जात असताना विळद परिसरात  रेल्वे रूळ तुटल्याचं यांच्या निदर्शनास आलं.

समोरच्या दिशेनं गाडी येत असल्याचं त्यांनी पाहिलं आणि आपल्या जिवाची परवा न करता त्यांनी आपल्या अंगातील लाल वस्त्र काढून हातात घेत फडकवत धाव घेतली. वयान आणि शरीरानं जास्त असल्यानं यांचा दम भरला तरी देखील हे न थांबता रेल्वेरुळातून पळत राहिले.

लाल कापड फडकवत असलेला व गाडीच्या दिशेनं एक व्यक्ती पळणारा पाहून रेल्वे चालकाच्या लक्षात येताच त्यांनी गाडी थांबली . त्यानंतर या शेतकर्‍यानं झालेल्या घटनेची माहिती चालकाला सांगितली. चालकानंही झालेली घटना वरिष्ठ आधिकारी यांना कळवली.

त्यानंतर रेल्वेचे कर्मचारी काही वेळानं येऊन तात्पुरता रेल्वे रूळ दुरूस्त करून गाडी सोडण्यात आली. शेतकरी रामदास बापूराव थोरात यांच्या ह्या जिद्दीनं,कार्याने हाजारो प्रवाशांचे प्राण वाचले.

थोरात यांच्या प्रसंगावधानतेचं सर्वांकडून कौतुक होत असून ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला तर रेल्वे मार्फतही त्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यांना योग्य ते बक्षीसही देण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post