शेतकऱ्यांचे सरकार : उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण


वेब टीम : मुंबई
उद्धव ठाकरे हे उद्या शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

या शपथविधी सोहळ्याला देशभरातील राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसह ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

हे सरकार आपलं सरकार असेल अन् सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देणार, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं.

त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शेतकऱ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post