श्रीनगरमध्ये बाजारात ग्रेनेड हल्ला, एक ठार


वेब टीम : श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा ग्रेनेड हल्ला केला आहे. मौलाना आझाद मार्गावरील बाजारात सोमवारी दुपारी भरगर्दीच्या वेळी झालेल्या या हल्ल्यात एक जण ठार तर १५ जण जखमी झाले. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला.

श्रीनगरमधील प्रसिद्ध आणि वर्दळीच्या लाल चौक भागाजवळ असलेल्या या बाजारात ग्रेनेड हल्ला करण्यात आला. गर्दीची वेळ असल्याने स्थानिकांची धावपळ झाली.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सैन्य दल आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहिमेला सुरुवात केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post