वेब टीम : मुंबई चहा पिण्याचे अनेक अपाय आपल्याला सांगितले जातात. चहात टॅनिन नावाचा घटक असतो आणि तो आपल्या आरोग्यासाठी घातक असतो, त्यामुळ...
वेब टीम : मुंबई
चहा पिण्याचे अनेक अपाय आपल्याला सांगितले जातात. चहात टॅनिन नावाचा घटक असतो आणि तो आपल्या आरोग्यासाठी घातक असतो, त्यामुळे चहा पिणे योग्य नाही. वारंवार चहा पिणे तर आजिबात योग्य नाही असे सांगितले जाते.
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात चहा सोडणे हा महत्वाचा भाग असतो. पण सिंगापूरमध्ये झालेल्या एका संशोधनात काही वेगळेच आढळून आले आहे.
या संशोधनात आढळून आले आहे की जे लोक नियमितपणे चहा पितात, त्यांच्या मेंदूतील निरोगी आकलनाशी निगडीत क्षेत्र चहा न पिणार्या लोकांपेक्षा अधिक सक्रिय असते.
हे संशोधन एजिंग नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. सिंगापूर येथील नॅशनल विद्यापीठाचे शास्त्रज्ञ फेंग ली यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. त्यांनी यासाठी 36 वृद्ध लोकांच्या न्यूरोइमेजिंगचे परीक्षण केले.
फेंग ली यांच्या म्हणण्यानुसार या संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षांतून चहा पिणे हे मेंदूच्या रचनेत सकारात्मक योगदान कसे देते याचा पहिला पुरावा मिळाला आहे, आणि त्यातून हे सूचित होते की नियमितपणे चहा पिणे हे मेंदूतील वृद्धत्वाशी निगडीत र्हासाला रोखण्यात मदत करते पूर्वीच्या अभ्यासातूनही मानवी आरोग्यासाठी चहा पिणे हितकारक असते, हे सिद्ध झाले आहे.