भारतीय बॉलर्ससमोर बांगलादेशने टाकली नांगी


वेब टीम : कोलकाता
पहिल्या दिवस-रात्र कसोटीतही भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व कायम राहिले आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा बांगलादेशचा निर्णय चांगलाच फसला.

भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर बांगला टायगर्सचा निभाव लागला नाही. त्यांचा पहिला डाव अवघ्या १०६ धावांवर आटोपला आहे.

कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर मालिकेतल्या दुसऱ्या कसोटीला सुरुवात झाली. दोन्ही देशांची हि पहिलीच दिवसरात्र कसोटी आहे.

भारतीय वेगवान गोलंदाजानी संपूर्ण वर्चस्व ठेवत बांगलादेशी फलंदाजांना डोकेही वर काढू दिले नाही.

कर्णधार मोमिनुल हक सह आणखी ३ फलंदाज भोपळा न फोडताच बाद झाले. तर केवळ ३ फलंदाजांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.

भारतीय वेगवान गोलंदाजांनी तिखट मारा करत बांगलादेशच्या फलंदाजीतील हवा काढून घेतली.

इशांत शर्माने २२ धावांत ५, उमेश यादवने २९ धावांत ३ तर शमीने ३६ धावांत २ बळी घेतले. फिरकीपटू रविंद्र जडेजाने केवळ एक षटक टाकले.

बांगलादेशचा फलंदाज महमूदल्लाहचा यष्टीरक्षक साहाने घेतलेला झेल आणि मोमिनुल हकचा रोहित शर्माने घेतलेला झेल हे चर्चेचा विषय ठरले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post