बांगलादेशचा भारतावर सनसनाटी विजय; मुशफीकुरची तडाखेबाज खेळी


वेब टीम : दिल्ली
भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान अनुभवी मुश्फिकुर रहीमच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने सहज पूर्ण केले.

या विजयासह बांगलादेशने भारताविरूद्ध टी २० इतिहासातील पहिला सामना जिंकला.

या आधीच्या ८ सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली होता. मालिकेतील दुसरा सामना गुरूवारी होणार आहे.

१४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर चौकार लगावणारा लिटन दास पहिल्या षटकात माघारी परतला.

त्याने ४ चेंडूत ७ धावा केल्या. दमदार फटकेबाजी करणारा मोहम्मद नईमदेखील मोठा फटका खेळताना झेलबाद झाला.

२ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने २८ चेंडूत २६ धावा केल्या. पण शिखर धवनने त्याचा झेल टिपत त्याला माघारी धाडले.

पहिले दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर सौम्या सरकार आणि मुश्फिकुर रहीम यांनी बांगलादेशला सावरले.

भारताने २० षटकात ६ बाद १४८ धावा केल्या. पांड्या ८ चेंडूत १५ धावा , तर सुंदर ५ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिला.

बांगलादेशकडून शफिउल आणि अमिनुल इस्लाम यांनी प्रत्येकी २-२ तर अफीफ होसेनने १ बळी टिपला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post