झारखंडमध्ये पाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक


वेब टीम : दिल्ली
झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या ठिकाणी पाच टप्प्यात मतदान होणार आहे.

झारखंडमध्ये ३० नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, ७ डिसेंबर रोजी दुसऱ्या, १२ डिसेंबर रोजी तिसऱ्या, १६ डिसेंबर रोजी चौथ्या आणि २० डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्याने राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आज जाहीर केलं.

येत्या ५ जानेवारी रोजी झारखंड विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या पाच उपायुक्तांनी १७-१८ ऑक्टोबर रोजी झारखंडचा दौरा केला होता.

झारखंडमध्ये एकूण १९ जिल्हे नक्षल प्रभावित असून त्यातील ६७ मतदारसंघ नक्षल प्रभावित आहेत.

>> ३० नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी १३ जागांसाठी मतदान होणार आहे

>> ७ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी २० जागांवर मतदान होणार आहे

>> १२ डिसेंबर रोजी तिसऱ्या टप्प्यात १७ जागांवर मतदान होणार आहे

>> १६ डिसेंबर रोजी चौथ्या टप्प्यात १५ जागांवर मतदान होईल

>> २० डिसेंबर रोजी पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात १६ जागांवर मतदान होणार आहे

>> पोलिंग बूथमध्ये २० टक्के वाढ

>> झारखंडमध्ये एकूण २.२६५ कोटी मतदार आहेत. १२ ऑक्टोबर २०१९ रोजी ही अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली होती

>> राज्यात एकूण १९ जिल्ह्यांपैकी ६७ जिल्हे नक्षल प्रभावित आहेत

>> हे १९ जिल्हे संवेदनशील असून १३ जिल्हे अति संवेदनशील आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post