शिवसेनेची मागणी स्वाभाविक; ठरल्याप्रमाणे व्हायला हवं : खडसे


वेब टीम : शिर्डी
पाच वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपची युती तुटल्याची घोषणा करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून काहीसे लांब आहेत.

खडसे आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गेले होते. त्यावेळी त्यांनी मनातील खंत बोलून दाखवली.

शिवसेना-भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या सुंदोपसुंदीबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे खंत व्यक्त करताना म्हणाले, ‘शिवसेना-भाजपमध्ये मध्यस्थी करण्याइतका मी मोठा राहिलेलो नाही.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी काय ठरले याची मला कल्पना नाही. त्यामुळे याबद्दल मी फारसं भाष्य करू शकत नाही.

मात्र शिवसेनेची मागणी स्वाभाविक आहे. दोन्ही पक्षांमध्ये ठरल्याप्रमाणे व्हायला हवं. ’ असे म्हणत त्यांनी राज्यात महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post