लातूर महापौर निवड; भाजपचे नगरसेवक फुटले, काँग्रेसचा झाला महापौर


वेब टीम : लातूर
राज्यातल्या बदलेल्या सत्तासमीकरणांचे पडसाद राज्यात इतरत्र उमटायला सुरुवात झाली आहे.

याचा प्रत्यय लातूर महापालिकेत आला आहे. भाजपचे स्पष्ट बहुमत असलेल्या लातूर महानगरपालिकेत सत्तांतर घडून आले आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे निवडून आलेत. भाजपचे नगरसेवक फुटले आणि काँग्रेसच्या पारड्यात मते पडली.

हात उंचावून झालेल्या मतदानात काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना 35 तर भाजपच्या शैलेश गोजमगुंडे यांना 33 मते मिळाली.

भाजपसाठी हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे. लातूर महापालिकेत एकूण 70 नगरसेवक असून भाजपचे 36 नगरसेवक होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post