अमेरिकेकडून भारत विकत घेणार सर्वात घातक एमके -४५ तोफा


वेब टीम : दिल्ली
युद्धा नौका आणि लढाऊ विमानांवर हल्ल्याची क्षमता असणाऱ्या एमके-४५ या प्रकारच्या अत्याधुनिक तोफा येत्या काही महिन्यांमध्ये भारताच्या ताफ्यात असतील.

अशा प्रकारच्या १३ तोफा भारताला विक्री करण्याच्या व्यवहाराला अमेरिकेने मंजुरी दिली. या १३ तोफांसाठी भारताला ७१०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

संरक्षण सौद्यांना मंजुरी देणाऱ्या अमेरिकेच्या संस्थेने बुधवारी रात्री या संदर्भात माहिती दिली.

अमेरिकेच्या संरक्षण खात्याने नौदलाच्या ऑपरेशन्ससाठी या तोफांची निर्मिती केली.त्यातील आधुनिक श्रेणी भारताला मिळणार आहे.

भारताला मिळणाऱ्या तोफांचा पुढचा भाग (बॅरेल) हा अपेक्षित लांबीपेक्षा अधिक असेल. या तोफांसोबत भारताला त्यासाठी लागणारा दारूगोळा, इतर उपकरणेही विकली जाणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post