फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश


वेब टीम : दिल्ली
राज्यातील सरकार स्थापनेतील पेचावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. लोकशाही मूल्यांचं संरक्षण होणं आवश्यक आहे.

लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार असून, न्यायालयाला काही आदेश देणं गरजेचे आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे.

त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (27 नोव्हेंबर) पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

विशेष म्हणजे गुप्त मतदानाला न्यायालयानं नकार दिला असून टेलिकास्ट करण्याचेही न्यायालयानं म्हटलं आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post