भाजपने उद्धटपणाची किंमत चुकवली : ममता बनर्जी


वेब टीम : कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला थेट पराभव पत्करावा लागला.

राज्यातील तीनही जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.या निकालानंतर तृणमूलच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला.

“लोकांना भारतीय असल्याचे सिद्ध करायला सांगणाऱ्या भाजपला मतदारांनी नाकारले.भाजपला त्यांच्या उद्धटपणाची किंमत चुकवावी लागली आहे,” असे ममता यांनी म्हटले.

पश्चिम बंगालमध्ये दोन वर्षानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजपने पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केले.

राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांवर सगळ्याचीच होती. मात्र,या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला.

पश्चिम बंगालमधील कालीगुंज, खरगपूर सदर आणि करीमपूर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले.

यातील कालीगुंज आणि खरगपूर सदर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर करीमपूर येथेही तृणमूलचा उमेदवार आघाडीवर आहेत.

पोटनिवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली.

बॅनर्जी म्हणाले, “हा जनतेचा विजय आहे.हा विकासाचा विजय आहे. उद्धटपणाचे राजकारण चालणार नाही,असे सांगत लोकांनी भाजपला नाकारले.

 राज्यातही राष्ट्रीय प्रश्न घेऊ लोकांना भारताचे नागरिक असल्याचे सिद्ध करायला सांगणाऱ्या भाजपविरोधात लोकांनी मतदान केले,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post