भाजपचं सत्तेवर नव्हे तर जनतेवर प्रेम


वेब टीम : मुंबई
जागा वाटपाचा कुठलाही फॉर्म्युला समोर आलेला नव्हता. त्यामुळे शिवसेनेने भाजपावर केलेल्या खोटारडेपणाच्या आरोपांचे आपण खंडन करतो सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

तसेच जनतेला वेठीला धरण्याचे काम शिवसेनेने केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, निकालानंतर अचानक पत्रकार परिषद घेऊन आमच्यासमोर पर्याय खुले आहेत अशी जनतेला वेठीला धरण्याची घोषणा शिवसेनेने केल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.

महायुतीच्या जनादेशाचा अनादर करुन भाजपाला खोटं ठरवण्याचं काम कोणी करु नये. भाजपाला खोटं ठरवण्याआगोदर त्यांनी विचार केला पाहिजे. अमित शाह आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचा खोट बोलण्याचा प्रश्नच येत नाही.

भाजपाचं सत्तेवर नव्हे तर जनतेवर प्रेम आहे. आम्हाला कोणताही खोटारडेपणा करायचा नाही, आम्हाला जनतेचे स्वप्न पूर्ण करायचंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post