दारु पाजून डोक्यात दगड घालून खुन


वेब टीम : अहमदनगर
मागील आठवड्यात गुरुवारी (दि.21) दुपारी पारनेर तालुक्यातील खडकवाडी शिवारात सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे.

सदरचा मृतदेह हा धोंडीभाऊ काशिनाथ गायकवाड (वय 28, रा.सावरगाव घुले, ता.संगमनेर) याचा असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

त्याचा 8-10 दिवसांपूर्वी दुरचा नातेवाईक असलेल्या अनिल तुकाराम खैरे (रा.सावरगाव घुले, ता.संगमनेर) याने दारु पाजून डोक्यात दगड घालून खुन केल्याचे पेालिस तपासात उघड झाले आहे.

पारनेर पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनि राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी करुन आरोपीला अटक केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post