कांद्याच्या दराने ओलांडला शंभरीचा टप्पा


वेब टीम : पुणे
परतीच्या पावसाने नव्या कांद्याचे भीषण नुकसान झाले आहे. त्यातच जुन्या कांद्याचा साठा संपला आहे. परिणामी बाजारात कांद्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.

त्यामुळे घाऊक बाजारात चांगल्या कांद्याचा क्विंटलचा दर आठ हजाराच्या जवळपास पोहचला आहे. तर किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याच्या दराने शंभरी ओलांडली आहे.

तर नवीन कांद्याचा किलोचा दर 80 रूपयावर पोहचला आहे. कांद्याचे दर गगनाला भिडल्याने कांदा खरेदी करताना ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे.

घाऊक बाजारात महिनाभरापासून रोज 25 ते 30 गाडीची आवक होत आहे. त्यात केवळ 20 टक्के माल चांगला आहे, तर 80 टक्के माल हलक्या प्रतीचा आहे.

एकीकडे कांद्याला राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे चांगल्या मालाची आवक अत्यल्प होत आहे. नवीन कांद्याची आवक वाढण्यास विलंब होणार आहे.

कारण सद्यस्थितीत बाजारात विक्रीसाठी येणारा कांदा ओला आहे. त्यात सडलेल्या मालाचे प्रमाण अधिक आहे.

केवळ ग्राहकांना कांदा उपलब्ध होत नसल्याने खराब मालालाही दर मिळत आहे. पावसाच्या तडाख्यातून ज्या भागातला कांदा वाचला आहे. त्याचे प्रमाण खुप कमी आहे.

काही ठिकाणी नवीन कांद्याची काढणी सुरू आहे. एकूण कांद्याच्या पीकाची स्थिती पाहता आणखी सुमारे दीड महिना कांद्याचे तर तेजीतच राहणार आहे.

नवीन कांद्याची आवक नीरा, लोणंद आणि नगर परिसरातून होत आहे. तर जुन्या कांद्याची आवक कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर येथून होत आहे.

दर वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत नवीन कांदा बाजारात दाखल होत असतो. मात्र यंदा परतीच्या पावसामुळे बहुतांश कांदा जमिनीतच खराब झाला आहे. तर काही ठिकाणी कांद्याचे नवे पीक करपले आहे.

जुन्या कांद्याला घाऊक आणि किरकोळ बाजारात उचांकी दर मिळत आहे. शेतकर्‍यांनी साठवलेला जुना कांदा संपला आहे. त्यामुळे येत्या काळातही बाजारातील कांद्याची स्थिती भीषण असणार 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post