संजय दत्त अब्दालीच्या भूमिकेत, पहा हा लूक


वेब टीम : मुंबई
बॉलीवूड मध्ये ऐतिहासिकपटांची चांगलीच चलती आहे. त्यातच पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित असलेला ‘पानिपत’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोमवारी अहमदशाह अब्दालीची भूमिका करणाऱ्या संजय दत्तने, पार्वतीबाईंच्या भूमिकेत झळकणाऱ्या क्रिती सॅननने व सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेत चमकणाऱ्या अर्जुन कपूरने आपला लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेतल्या अर्जुन कपूरनेही ‘आपण ज्यावर विश्वास ठेवतो त्यासाठी ठामपणे उभे राहणे हीच खरी शूरता आहे. मग त्यासाठी एकटे उभे रहावे लागले तरी बेहत्तर’ असं म्हणत आपले छायाचित्र पोस्ट केले आहे.

तर क्रिती सॅननने ‘खऱ्या राणीला मुकुटाची गरज नसते’ असं म्हणत आपला लूक चाहत्यांसमोर आणला आहे. सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेतल्या अर्जुन कपूरनेही ‘आपण ज्यावर विश्वास ठेवतो त्यासाठी ठामपणे उभे राहणे हीच खरी शूरता आहे. मग त्यासाठी एकटे उभे रहावे लागले तरी बेहत्तर’ असं म्हणत आपले छायाचित्र पोस्ट केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post