आमचं ठरलंय पण 'हा' निर्णय होणे बाकी : चव्हाण


वेब टीम : दिल्ली
राज्यात विधानसभा निवडणुका पार पडून आता महिना उलटला आहे. परंतु, सत्तास्थापनेचा पेच न सुटल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या दीर्घ बैठका दिल्लीत पार पडल्या व दोन्ही पक्षांचं एकमतही झालं. पण अजूनही मित्रपक्ष व शिवसेनेसोबत चर्चा व मंत्रिपदाचे सूत्र ठरणे बाकी आहे.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, ‘दोन्ही पक्षांच्या नेत्यांची दुसरी बैठक आज पार पडली. सर्व मुद्द्यांवर आमचं एकमत झालं असून आता आम्ही मुंबईला निघालो आहोत.

आमच्या निवडणुकीतील मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू. त्यानंतरच या नव्या आघाडीची अंतिम घोषणा करू आणि मग राज्यपालांना भेटू,’ अशी माहिती दिली.

तीन पक्षांच्या एकत्रित सरकारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असणार याबाबत चर्चा सुरु आहेत. याबाबत बोलताना ‘शिवसेनेसोबत चर्चा झाल्यानंतर हा फॉर्म्युला ठरेल. त्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र येत त्याची माहिती माध्यमांना देतील,’ असं चव्हाण यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post