महाराष्ट्रातही रामराज्यच येणार, थोडा धीर धरा


वेब टीम : नाशिक
राज्यात रामराज्यच येणार आहे; धोडा धीर धरा आणि वाट बघा, असे गिरीश महाजन म्हणाले.

फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून संबोधले जाणारे महाजन निकालानंतर पहिल्यांदातच माध्यमांशी सत्तानाट्यावर बोलले.

नाशिकमध्ये अयोध्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काळा राम मंदिरात महाआरती करण्यात आली.

तसेच मंदिरात जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला. अयोध्या निकाल सगळ्यांसाठीच चांगला आहे. सर्वोच्च न्यायालयाने संतुलन राखले आहे.

सर्वधर्मीयांनी या निकालाचे स्वागत केले आहे. हा निकाल म्हणजे कुणाचा जय किंवा पराजय नाही. दोन्ही धर्मीयांचा निकालात विचार करण्यात आल्याचे महाजन म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post