प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड


वेब टीम : दिल्ली
खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत राहतात, त्यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीत स्थान देण्यात आले आहे.

मालेगाव स्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर या आरोपी आहेत. त्या जामिनावर बाहेर आहेत.

साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कमिटीचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे करीत आहेत.

संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण 21 सदस्य आहेत. यात प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधने, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर जादूटोना केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त वक्तव्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post